News Flash

महापालिकेने तोडली २४३ पाणी कनेक्शन्स…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर पाणी पुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसूल मोहिमेअंतर्गत ९ डिसेंबर ते २७ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत सुमारे ११२१ थकबाकीदारांना भेटी देऊन सुमारे २४३ थकबाकीदारांवर कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर परिसर, कसबा बावडा, शाहूपुरी, सदर बाजार, विक्रमनगर, भोसलेवाडी, महालक्ष्मीनगर, लक्ष्मीपुरी, गंगावेश, दौलतनगर, शाहूनगर, राजारामपुरी या परिसरात तसेच शासकीय रुग्णालय या थकबाकीदारावर कारवाई करण्यात आली. यामध्ये रु. १, ३१, १९, ०३८ इतकी थकबाकी वसुली करण्यात आली.
तर ७७८९ थकबाकीदारांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ वे कलम ४३९ (१) व (२) अन्वये नोटीस देण्यात आलेली आहे. हीकारवाई जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख मोहन जाधव, पृथ्वीराज चव्हाण, उदय पाटील, रणजीत संकपाळ, शरद पोवार, ताजुद्दीन सिदनाळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!