News Flash

आर्थिकदृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण द्या : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) : सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केली.
पवार म्हणाले की, दिवसेंदिवस शेती कमी होतेय. ८२ टक्के लोकांकडे २ एकरांपेक्षा कमी शेती. तर ७० ते ७२ टक्के शेतजमिनीला पाणी नाही. त्यामुळे आर्थिक निकषासोबत शेतकी व्यवसाय करणाऱ्या वर्गाला शेतकरी म्हणून आरक्षण द्यायला हवे. कोणत्याही प्रकारची तयारी न करता शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस लाभार्थी आणि निधीचा आकडा कमीकमी होत आहे, असा टोलाही पवारांनी लगावला.
मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रात आधी झाली. महिला आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हाही मी मुख्यमंत्री होतो. त्यामुळे माझी भूमिका स्पष्टच होती. त्यावर एससी, एसटी आणि ओबीसी यांना घटनेने जे आरक्षण दिले आहे. त्याला धक्का लागता कामा नये. त्या व्यतिरिक्त अन्य घटकांना आर्थिक निकषावर आरक्षण देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!