News Flash

श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री आणणार मुंबईत : उद्या अंत्यसंस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखेर श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी कपूर कुटुंबीयांना सरकारी वकिलांकडून एनओसी मिळाले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. आज रात्रीपर्यंत नऊ वाजेपर्यंत कपूर कुटुंबीय श्रीदेवी यांचे पार्थिव घेऊन मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे सांगून दुबईच्या सरकारी वकिलांकडून आता ही केस बंद करण्यात आली आहे. आता खासगी विमानाने पार्थिव रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत ग्रीन एकर्स येथे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या सकाळी अंत्यविधी केला जाणार आहे.
पुढील तपासासाठी बोनी कपूर यांना दुबईतच थांबावे लागणार असल्याचे वृत्त होते. पण आता त्यांना क्लीनचीट मिळाली आहे. बोनी कपूर यांचे पासपोर्ट दुबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त होते. पण श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे चौकशीअंती समोर आले आहे.
दुबईतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणण्यास मंजुरी मिळणार होती. सरकारी वकील या प्रकरणाची चौकशी करत होते. त्यांना गरज वाटली तर, श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे पुन्हा एकदा पोस्ट मॉर्टमही केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!