News Flash

देवर्डे गावठाणाची वाढ व्हावी, अन्यथा ठिय्या आंदोलन : संग्राम सावंत

आजरा (प्रतिनिधी) : देवर्डे (ता. आजरा) येथील गायरान जमिनीचे गावठण वाढ झालेल्या भूखंडधारकांना ताबा मिळावा. तसेच मालकी हक्काची सनद ७/१२ आणि ८ अ च्या उता-यावर नाव लावण्यासाठी गावठाण वाढ संघर्ष समितीच्या वतीने जोरदार संघर्ष करणार आहे. असे गावठाण वाढ संघर्ष समितीचे मुख्य संघटक संग्राम सावंत यांनी देवर्डे येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले.

यावेळी सावंत म्हणाले की, मौजे देवडे येथील गायरान जमिनीचा गट नंबर ३४० च्या गटाची गावठाण वाढीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अनेक वेळा अर्ज, निवेदने आणि तक्रारी तहसीलदारांकडे यांच्याकडे वारंवार केलेली आहेत. मात्र प्रशासनाने हे गावठाण वाढीची प्रक्रिया कायद्याप्रमाणे पूर्णत्वाला नेलेली नाही. तिची शास्त्रीय पद्धतीने आणि कायद्याप्रमाणे निर्गत झालेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने पूर्ण होण्यासाठी प्रत्येक विभागाची जाबाबदारी पहिल्यांदा निश्चित करावी लागेल तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो.

यावेळी प्रमोद पाटी, रवी भोसले, बबन तानवडे, राजेंद्र देशमुख, केरबा बागडी, प्रभाकर कांबळे, शकुंतला बागडी, संगीता बुरूड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!