News Flash

संपादीत जमिनीला योग्य मोबदला मिळावा, अन्यथा आत्मदहन : संजय गोनुगडे

कागल (प्रतिनिधी) : कागल येथे प्रादेशिक परिवहन विभागाच्या सिमा तपासणी नाक्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. याबाबत न्यायालयानेही आदेश दिला असून याच्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ९ मार्चला आरटीओ कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा संजय गोनुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

संजय गोनुगडे यांची सर्वे नंबर ५१० आणि ९/२ मधील नऊ एकर शेती संपादीत केली आहे. या जमीनीला बाजार भावाप्रमाणे दर मिळावा यासाठी गोनुगडे यांच्यासह ५२ शेतकरी जिल्हा न्यायालयात गेले होते. न्यायालयाने २७ जूलै २o१७ रोजी शेतकऱ्यांचे बाजूने निकाल दिला आहे. शासनाने मात्र वाढीव रक्कम गोनुगडे यांना दिलेली नाही. याबाबतही गोनुगडे न्यायालयात गेले होते. सहा तारखा झाल्या परंतु प्रत्येक तारखेला अधिकारी जमिनीची रक्कम जमा करण्याचे आश्वासन देतात पण कृती करीत नाहीत. या प्रकाराला आता आपण कंटाळलो असल्यामुळे हा आत्मदहनाचा निर्णय घेतल्याचे संजय गोनुगडे यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!