News Flash

काळभैरीच्या जीर्णोद्धाराचे काम वर्षभरात पूर्ण करणार : रमेश रिंगणे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : काळभैरी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम एक वर्षात पूर्ण करणार, असे आश्वासन लक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी केले. ते गडहिंग्लज येथे आज (मंगळवार) काळभैरी मंदीर जीर्णीद्धारासाठी लक्ष्मी मंदिरामध्ये झालेल्या गावसभेमध्ये बोलत होते. ही सभा नागाप्पाण्णा हत्ती यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी रमेश रिंगणे म्हणाले की, काळभैरी मंदिरामध्ये झालेला प्रकार निंदनीय असून इथून पुढे मंदीराच्या बाबतीत चांगले निर्णय घेऊन मंदिराची सुरक्षितता व पावित्र्य जोपासण्यासाठी आम्ही सर्वजण एकटवलो आहोत. कुणाची बदनामी करण्याचा हेतू नसून मंदिराचे बांधकाम त्वरित पूर्ण व्हावे. मंदिराच्या सुरक्षितेबद्दल निर्णय घेऊन थोड्याच दिवसांत गाभारा सुशोभिकरण करण्याच्या दृष्टीकोनातून पावले उचली जातील, असे सांगितले.

राजू तारळे म्हणाले की, चोरीच्या दुसऱ्या दिवसापासून बैठका सुरू असून उपसमिती एकाही बैठकीला आली नाही यावरून ही समिती किती जबाबदारीने काम करत हे गडहिंग्लजकरांना दिसून आले आहे. दरवर्षी यात्रेवेळी ७ ते८ लाख जमा होतात. तर १८ वर्षात या पैशाचे काय केले असे अनेक प्रश्न जनतेसमोर आहेत. तर जीर्णोद्धार कमिटीने आपल्याला जमत नसेल तर बाजूला व्हावे आणि दुसऱ्याना काम करणेस संधी देऊन मंदिराचे काम पूर्णत्वास न्यावे.

यावेळी गडहिंग्लज पोलिसांनी काळभैरी मंदिरातील चोरीचा छडा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करुन लवकरच लावू आणि चोरट्यांना जेरबंद करु अशी ग्वाही दिली. या वेळी सुनील शिंत्रे, रियाज शमनजी, बसवराज आजरी, नागेश चौगुले, सतीश हळदकर, रोहण हंजी, राजू शेटके, शेखर येरटे, श्रीनिवास वेर्नेकर, संजय संकपाळ, चंद्रकांत सावत, विठ्ठल भामंनगोळ, राहुल शिरकोळे, महेश सलवादे, सुधीर पाटील, प्रकाश धबाले यांच्यासह भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!