News Flash

गडहिंग्लजमध्ये जनता दलाची सरकार विरोधात निदर्शने…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : देशात आणि महाराष्ट्रामध्ये केंद्र व राज्य सराकर गोरगरीब जनतेवर अन्याय करीत असलेच्या निषेधार्थ आज (मंगळवार) प्रांत कार्यालयासमोर माजी आ. श्रीपतराव शिंदे आणि नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाच्या कार्यकर्त्यानी जोरदार निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात म्हटंले आहे की, कर्जमाफी प्रकरणामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. भीमा कोरेगांव येथे दलित बांधवावर हल्ला करणाऱ्या प्रतिगामी आणि हिंदुतवादी संघटनांना पाठीशी घालणाऱ्या सरकारला जाग यावी, प्राथमिक शाळा बंद करुन गोरगरीब मुलांमुलींना शिक्षणाचे दरवाजे बंद करु नये, देवदासी, अपंग लोकांकडे दुर्लक्ष होऊ नये, विभागात वाहतूकीस योग्य नसलेल्या रस्त्याकडे लक्ष देणे, चित्रीचे लाभ क्षेत्र वाढवावे आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत.

यावेळी काशीनाथ देवगोंडा, उदय कदम, बाबुराव धबाले, बाबू म्हेत्री, कृष्णा परीट, राम मजगी, दत्ता मगदुम, रमेश मगदुम, सुभाष देसाई, अजित शिंदे, यांच्यासह जनता दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!