News Flash

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेवीकांनी आज (मंगळवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले आहे.

नुकतेच केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अंगणवाडी कर्मचा-यांसाठी कोणतीही तरतुद करण्यात आली नाही. परिणामी काही राज्यांनी सेविकांना आणि कर्मचा-यांना मानधनवाढ दिली आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने मात्र यामध्ये काहीच योजना आखली नाही. त्यामुळे अंगणवाडींचे प्रश्न सुटत नाहीत. गेले नऊ महिने पोषण आहाराची बिले मिळालेली नाहीत, सहा-सहा महिने मानधन मिळत नाही. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी १४ मार्चला मुंबई येथे विधानसभेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे, यावेळी आंदोलकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!