News Flash

इथे ‘नवरदेव’ भाड्याने मिळतात…

हनोई (वृत्तसंस्था) : ‘इथे नवरदेव भाड्याने मिळतील’ असा बोर्ड जर तुमच्या बघण्यात आला तर तुम्ही नक्कीच बुचकाळ्यात पडाल. पण जगात एक असाही एक देश आहे. जिथे खरोखरच नवरदेव भाड्याने मिळतात. त्या देशाचे नाव आहे, व्हिएतनाम. या देशातील काही कंपन्या चक्क नवरदेव भाड्याने देऊन प्रचंड पैसा कमाताना दिसत आहेत. या देशात जणू काही अशा कंपन्यांचे पेवच फुटले आहे.

विशेष म्हणजे असे की, या कंपन्या केवळ नवरदेवच नव्हे तर, नातेवाईकही भाड्याने देतात. एका लग्नात नवरेदव आणि नातेवाईक भाड्याने यामध्ये (मामा, मामी, काका, काकी, आत्या, मावशी) आदी पाहुणे देण्यासाठी कमीत कमी ४ लाख रूपये शुल्क आकारले जाते. तर ग्राहकांच्या मागणीनुसार या कंपन्या २० ते ४०० पाहुण्यांची व्यवस्था करू शकतात.

दरम्यान, व्हिएतनाममध्ये समस्या अशी आहे की, येथील अनेक मुली या कुमारी माता बनतात. यात धक्कादायक म्हणजे बिना लग्नाची एखादी मुलगी जर गरोदर राहिली तर, तो कलंक मानला जातो. त्यामुळे या सामाजिक कलंकातून मुक्तता मिळविण्यासाठी बनावट विवाह केले जातात. अशा कुटुंबियांना गाठून या कंपन्या प्रचंड फायदा कमावतात. गर्भवती मुलींसोबत केवळ दिखावा म्हणून लग्न करण्यासाठी या कंपन्या भाडेतत्वावर नवरदेव पुरवतात. त्यासाठी शुल्क म्हणून या कंपन्या लाखो रुपये आकारतात.

तर भाडेतत्वावर नवरदेव म्हणून लग्नाच्या मंडपात उभे राहणे हा एक तिथला व्यवसायच बनला आहे. भाडेतत्वावर लग्नासाठी उभा राहिलेले बहुतांश नवरेदव हे आधीच विवाहीत असतात. इतकेच नव्हे तर ते एक दोन मुलांचे पिताही असतात. पण अविवाहीत गर्भवती मुली आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना भाडेतत्वावर खरेदी करतात आणि त्यावर त्यांना काहीच गैर वाटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!