News Flash

गेल्या ४८ तासात विदर्भात ‘सात’ वाघांचा मृत्यू…

नागपूर (प्रतिनिधी) : विदर्भात गेल्या ४८ तासात झालेल्या विविध घटनांमध्ये सात वाघांनी आपले प्राण गमावलेत. त्यापैकी काही वाघांच्या मृत्यूंना वनविभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचे पुढे आले आहे.

रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात एका जखमी वाघाचा उपचाराविना मृत्यू झाला. सोमवारी नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी भागातील जंगलात हा बछडा वाघीणीपासून दूर झाल्याने एकटाच आढळला होता. अशक्त झालेल्या बछड्याला चंद्रपूर शहरालगत असलेल्या वनविभागाच्या प्राथमिक शुश्रूषा केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर तज्ञ वैद्यकीय अधिका-यांच्या देखरेखीत त्याचावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान या बछड्याचा मृत्यू झाला.

तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या कोलितमाराजवळ पेंच नदीत २४ फेब्रुवारीला एक वाघ मृतावस्थेत आढळला. गोरेवाड्यात वन्यप्राणी बचाव केंद्रात एका वाघिणीने तिची चार पिल्ले गमावली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!