News Flash

तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : पाचजणांचा मृत्यू

सोलापूर (प्रतिनिधी) : तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर शितल हॉटेलजवळ पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या वाहनावर चारचाकी वाहनाच्या जोरदार धडकेत पाच जण ठार झाल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) घडली. हा अपघात आज सकाळी साडेपाचच्या सुमारास झाला.

या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर जिल्हा शायकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील एक मृत सोलापूर जिल्ह्यातील तर उर्वरित कर्नाटक राज्यातील आहेत. चालकाचे जीपवरचे नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारलाच जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, कारचा संपूर्ण चुराडा झाला तर जीपही पलटी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!