News Flash

लहान मुलांसाठी वेगळे ‘बाल’आधार कार्ड…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमकार्डपासून ते अगदी गॅस जोडणीपर्यंत आता सगळ्यासाठीच आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. बँक खाते उघडतानाही आधारकार्डच लागते. इतकेच नव्हे तर आता मुलांच्या शाळा प्रवेशासाठी अगदी ज्युनीयर केजीसाठीही आधारकार्डसक्ती करण्यात आली आहे. पालकांच्या आधारकार्डच्या माध्यमातून लहानग्यांचे आधारकार्ड काढले जाते. पण आता लहान मुलांसाठी वेगळे बालआधार कार्ड देण्यात येणार आहे.

आता वयाच्या पाच वर्षांखालील बालकांना निळ्या रंगाचे आधारकार्ड मिळणार आहे. बालआधारकार्डसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुलाच्या शाळेचे ओळखपत्र हे आधारकार्डच्या नावनोंदणीसाठी चालू शकेल असे युआयडीएआयने सांगितले आहे. आधारकार्डासाठी बायोमेट्रीक माहिती आवश्यक असते. पण बालआधार कार्डच्या बाबतीत त्याची आवश्यकता नसेल, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, जेंव्हा एखादे बालक वयाची ५ वर्षे पूर्ण करील तेव्हा त्याने सामान्य आधारकार्डसाठी आवश्यक असणारी बायोमेट्रिक चाचणी करणे अनिवार्य असेल. ही प्रक्रिया मोफत होणार असून पालक आपल्या पाल्याची घराजवळच्या आधारकार्ड केंद्रात ही चाचणी करू शकतील. असे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!