News Flash

कूर कालव्याचे अस्तरीकरण करा : शेतकऱ्यांची मागणी

कुर (प्रतिनिधी) : काळाम्मावाडी प्रकल्पाच्या कुरमार्गे मिणचे परिसरात जाणाऱ्या उजव्या कालव्याच्या निर्मीती पासून कालव्याचे अस्तरीकरण न केल्याने मिणचे खोरे परिसरातील अनेक जमीनी नापीकतेच्या छायेत आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांपूढे शेती पिकवणे ही एक मोठी समस्या निर्माण होवू राहीली आहे. वारंवार मागणी करूनही सरकारचे डोळे उघडत नाहीत त्यामुळे शेतकरी हवालदिल होवून प्रसंगी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

कालवा फुटीची समस्या मोठया प्रमाणात होत असल्याने पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही. सरकारने कालवा नियोजनासाठी १९ गावांसाठी केवळ तीनच कर्मचारी नेमले आहेत. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे ३० लाख २६ हजार इतकी पाणीपटटी थकीत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी या कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्याचा मोबदला अदयाप मिळालेला नाही. ही परिस्थीती लक्षात घेता लोकप्रतिनीधींनी या बाबीचा पाठपुरावा करावा, अशी मागणी मिणचे खोऱ्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. ही मागणी मान्य न केल्यास प्रसंगी शेतकरी आपल्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!