News Flash

गडहिंग्लज येथे मटका घेणाऱ्या चौघांना अटक

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमध्ये मटका प्रकरणी चारजणांना गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व मटका साहित्य जप्त केले आहे.
गडहिंग्लज – कडगाव रस्त्यावर उदय विष्णू गायकवाड़ (रा. वडरगे वय-४५) एस. टी. स्टॅंडसमोर भरत बाळाप्पा होसमनी (रा. कड़गांव रोड, गडहिंग्लज वय ४५) आजरा रोडवर बाबालाल मुजावर (रा. गवळीवाडा, गडहिंग्लज वय-३९) हॉटेल मधुबनसमोर भारत शंकर डोमणे (रा. काळभैरी रोड, गडहिंग्लज वय ४५) या चौघांविरुद्ध कारवाई करून रोख २६९७ व मटक्यातील साहित्य जप्त करण्यात आले. गडहिंग्लज पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!