News Flash

डी. एस. कुलकर्णी यांच्या पावणेसहा कोटींच्या गाड्या जप्त

पुणे (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या सुमारे पावणेसहा कोटींच्या आलिशान गाड्या आज (सोमवार) जप्त केल्या. यामध्ये सहा मोटारी आणि एका दुचाकीचा समावेश आहे.
कुलकर्णी यांच्यावर चार हजार पंचेचाळीस कोटी रुपयांची देणी असल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे. यातील अठ्ठावीसशे ब्याण्णव कोटींची विविध बँकांची कर्जे आहेत. तर, अकराशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. डीएसकेंनी वेगवेगळ्या नावांनी ५९ कंपन्या उभारल्या आहेत. त्या मार्फत डीएसकेंनी आर्थिक व्यवहार केले असल्याची माहितीदेखील तपासात पुढे आली आहे. तपास यंत्रणांनी तज्ञामार्फत डीएसकेंच्या व्यवहारांचे ऑडिट करुन ही माहिती मिळवली आहे.
आज डीएसकेंच्या ७ महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये २ बीएमडब्ल्यू, २ टोयोटा, १ ऑडी, १ पोर्शे गाडी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची किंमत अंदाजे पाऊणेसहा कोटी असल्याचं समजतं. १.७५ कोटींची पोर्शे, २.५ कोटींच्या दोन बीएमडब्ल्यू, ५० लाखांची ऑडी, ६० ते ६२ लाख किमतीच्या टोयोटा कॅम्ब्री कार आणि ३६ लाखांची दुचाकी जप्त करण्यात आलीये. सध्या डीएसके यांच्या पत्नी आणि मुलाकडे तपास सुरु आहे. मात्र, तपासात ते सहकार्य करत नसल्याचं पोलिसाचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!