News Flash

आझाद मैदानात शिक्षकांचा बेमुदत एल्गार सत्याग्रहाला सुरुवात…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शिक्षक भरती त्वरीत करावी, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज (सोमवार) पासून डीएड्, बीएड् स्टुडंट असोसिएशनतर्फे मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत एल्गार सत्याग्रह आंदोलन चालू करण्यात आले.

यावेळी राज्यात शिक्षक भरती त्वरीत करावी, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून पासून डीटीएड्, बीएड् स्टुडंट असोसिएशनतर्फे मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत एल्गार सत्याग्रह आंदोलन सुरु करण्यात आले. यामध्ये राज्यातील लाखो युवक-युवती या डीएड्, बीएड् पदवी घेऊनही नोकरीपासून वंचित आहेत. राज्य शासनाने यापूर्वी चारवेळा शिक्षक पात्रता परीक्षा घेतली. त्यासह गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा ऑनलाईन घेतली. मात्र, अद्यापही शिक्षक भरतीबाबत शासनाकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शासन निर्णय दि.२३ जून २०१७ च्या निर्णयानुसार २४ हजार रिक्त जागांवरील शिक्षक भरतीसाठी केंद्रीय पद्धतीने त्वरित कार्यवाही करावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांबाबत आंदोलन करण्यात येत आहे.

याची सुरुवात मुंबईतील एल्गार सत्याग्रहाने सुरु झाली असून. या आंदोलनात महाराष्ट्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. असून यावेळी लातूरचे बेरोजगार शिक्षक सुनिल जाधव, भिवंडीचे अमोल गावकरे, अहमदनगरचे विजय भणगे, बुलढाण्याचे सीमा भोसले यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडून सरकार बाबतीत तसेच शिक्षण मंत्री यांच्या बद्दल रोष व्यक्त केला.

आंदोलनात डी.टी.एड.,बी एड असोशिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक संतोष मगर, राज्य उपाध्यक्ष परमेश्वर पाटील, महिला राज्य उपाध्यक्ष प्राजक्ता गोडसे, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष योगेश गांगुर्डे, राज्य संघटक सुमित लोखंडे, सरचिटणीस योगेश महाजन, कोल्हापूरचे राजू उदाळे, दुर्गा गाडेकर, सतिश घोरपडे यांच्यासह महाराष्ट्रातील डीटीएड, बीएड असोशिएशनचे पदाधिकारी मोठ्या संघाने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!