News Flash

अन्यथा…पिंपळगावात रास्तारोको करणार : अशोक पाटील

पिंपळगाव (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाने गारगोटी ते उत्तुर रस्त्याचे दोन्ही बाजूस नियमानुसार गटर्स न केल्यास (दि.२८) पिंपळगाव (ता.भुदरगड) येथे रास्ता रोको आंदोलन तसेच उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

या निवेदनात म्हटंले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गारगोटी ते उत्तुर रस्त्याचे रुंदीकरण आणि गटर्सचे काम चालू आहे. सदरचे काम करत असताना रस्त्याच्या दुतर्फा गटरचे काम न करता एकाच बाजूने गटरचे काम सुरू आहे. अशाच पद्धतीने पिंपळगाव येथेही काम सुरू आहे. हे काम राजकीय आकसापोटी सुरू असून ते नियमानुसार नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गारगोटी पासून गटर्सचे काम न करता फक्त काही ठिकाणीच हे काम करण्यात येत आहे. त्यामध्ये विशिष्ट घटकांतील लोकांच्यावर अन्याय होत आहे. हे काम गारगोटीपासून उत्तुरपर्यंत शासकीय नियमानुसार रुंदीकरण आणि गटर्स करण्यात यावीत. अन्यथा याचा निषेध म्हणून बुधवार (दि.२८) रोजी पिंपळगाव येथे रास्ता रोको आंदोलन आणि उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती, शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख अशोकराव पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!