News Flash

रिक्षात प्रवाशाच्या पिशवीतील अॅसिडची बाटली फुटल्याने चारजण जखमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश – शिंगणापूर मार्गावर वाहतूक करणा-या अॅपे रिक्षातील प्रवाशांच्या पिशवीतील अॅसिडची बाटली फुटल्याने दोन महिला आणि बालक, बालिका जखमी झाले. जखमींमध्ये सरस्वती मोहन गजगेश्वर, सानिका सागर बिडकर (वय १२), स्वप्नील सागर बिडकर (वय १०, सर्व रा. शिंगणापूर) यांच्यासह एक महिला (नाव समजलेले नाही) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा प्रकार आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.
आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान गंगावेशहून शिंगणापूरला जाणा-या अॅपे रिक्षामध्ये सरस्वती बिडकर यांनी कराड येथील मुलाकडून तननाशक औषध आणले होते. दारातील तण नाहीसे व्हावे, म्हणून तिने पिशवीमध्ये प्लास्टिकच्या बाटलीतून अॅसिड आणले होते. याच पिशवीमध्ये तिने भाजीपाला, कांदे भरल्यामुळे बाटली दबल्यामुळे ती रंकाळा टॉवर येथे ती फुटली. याच्यामधील अॅसिड बिडकर यांच्या मांडीवर पडले. अॅसिडचा चटका सहन झाल्यामुळे त्यांनी पिशवी बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी रिक्षातील दोन मुलांसह एका महिलेच्या हाता-पायावर सांडल्याने ते जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!