News Flash

कोल्हापुरात पॅरा अॅथलेटिक स्पर्धेचे ३ मार्चला आयोजन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : १८ व्या राष्ट्रीय पॅरा अथलेटिक चॅम्पियनशिप २०१८ पंचकुला, हरियाणा येथे होणार आहे. या स्पर्धेची पहिली राज्य पॅरा अॅथलेटिक क्रीडा स्पर्धा आणि महाराष्ट्र संघ निवड चाचणी घेण्याचा मान प्रथमच कोल्हापूरला मिळाला आहे. याची माहिती पॅरालिंपीक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष देवदत्त माने यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेत थाळी फेक, भाला फेक, उंचउडी, धावणे या खेळांचा समावेश असून या स्पर्धेस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ३५० ते ४०० पॅरा खेळाडू आपले क्रीडा कौशल्य दाखवणार आहेत. या स्पर्धा दोन दिवस चालणार असून शनिवारी (दि.3 ते 4) मार्च दरम्यान पोलीस परेड मैदान, कसबा बावडा आणि शिवाजी विद्यापीठ, सिंथेटिक ट्रेक या ठिकाणी संपन्न होणार आहेत. यामध्ये अंध, अस्थिव्यंग या दिव्यांग प्रवर्गातील खेळाडूचा सहभाग असणार आहे.

दि. ३ मार्चला सकाळी नऊ वाजता पोलीस परेड मैदान, कसबा बावडा येथे या स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, आ. सतेज पाटील, महापौर, आयुक्त, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, ऋतुराज पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन असोसियशनच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी विकास चौगुले, सुरेश ढेरे, उमेश चटके, युनूस शेख, सरदार पाटील, जानकी मोकाशी, रंजना गुलाईकर, गणेश शिंदे, वैजनाथ केसरकर, विष्णुपंत पाटील, अक्षय जाधव, अक्षय अत्तार, अक्षय म्हेत्तर, नलिनी डवर, आशुतोष डोंगरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!