News Flash

काळभैरी चोरीचा अपप्रचार थांबवा : काळभैरी देवस्थान उपसमिती

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : काळभैरी देवस्थान येथे झालेल्या चोरीचा कांही मंडळी अपप्रचार करून भाविकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी तो थांबावा आणि काळभैरी मंदीरात झालेल्या चोरीचा सखोल तपास करावा, असे निवेदन आज (सोमवार) काळभैरी देवस्थान उपसमितीतर्फे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटंले आहे की, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर यांच्यातंर्गत श्री काळभैरी देवस्थान (डोंगर) उपसमिती सन २००२ पासून कार्यरत आहे. समिती मार्फत विकासाचीही कामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे विकासकामांचा जमा-खर्च प्रत्येक साली ३१ मार्च अखेर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर यांच्याकडे सादर केला आहे. तरी काही मंडळी काळभैरी चोरीचा अपप्रचार करून नागरिकांच्या मनामध्ये भावनिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिशेबाचा विनाकारण तेढ निर्माण करून उपसमितीला बदनाम करीत आहेत. तरी चाललेल्या गैरकृत्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. तसेच काळभैरी येथे झालेल्या चोरीमुळे भाविक व नागरिकांच्या भावना दुखावल्या असून या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषीवर योग्य ती कडक कारवाई करावी. असे म्हटंले आहे.

या निवेदनावर अध्यक्ष निरंजन कित्तुरकर, सचिव विश्वनाथ पाटील, सदस्य बसगोंडा पाटील, दत्ताजीराव बरगे, विष्णूपंत पोवार, राजेंद्र मांडेकर यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!