News Flash

काळभैरी मंदिरातील चोरीचा छडा त्वरीत लावा : गडहिंग्लज शिवसेना

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजचे आराध्यदैवत काळभैरी मंदीरात चोरीची घटना घडून अदयापही चोरीचा छडा लागला नाही. तरी हा प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणाचा त्वरीत छडा लावावा. असे निवेदन गडहिंग्लज शिवसेनेतर्फ प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटंले आहे की, तीस वर्षांपूर्वी शहरातील काळभैरी मंदीरात सोन्याच्या मुखवटयाची झालेल्या चोरीचा तपास अदयापही लागला नाही. काळभैरी मंदीरातील चोरीचा दोन-तीन दिवसाच्या तपासात कोणताही धागा मिळाला नाही. या प्रकरणाचा तपास वेगवेगळया स्तरावरून सुरू असला तरी जनतेत विश्वास निर्माण व्हावा, असा तपास नाही. यामुळे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ स्तरावरून होणे गरजेचे आहे. तरी आपण पोलिस अधिकारी, पंच, प्रतिष्ठाची बैठक घेऊन या प्रकरणाचा लवकर छडा लावण्यासाठी पोलीसांना सुचना द्याव्यात. जनतेच्या भावना तीव्र असून गडहिंग्लज बंद करण्याची चर्चा सुरू आहे. तरी आपण याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला.

या निवेदनावर सहसंपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, महिला जिल्हा संघटक संज्योती मळवीकर, तालुका प्रमुख दिलीप माने, शहर प्रमुख मनोज पवार, सागर कुराडे, प्रतिक क्षीरसागर, अमोल नार्वेका,रोहिनी भंडारे, मंगल जाधव, सुवर्णा चांदेकर, शांताताई जाधव, सुरेश हेब्बाळे यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!