News Flash

श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द : अहमदनगर पालिकेचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी) : श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव अहमदनगर महापालिकेच्या महासभेत आज (सोमवार) मंजूर करण्यात आला. तसेच त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठराव देखील महापालिकेने एकमतानं मंजूर केला आहे.

भाजप गटनेते दत्ता कावरे यांनी आज हा ठराव मांडला होता. या ठरावाला विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी अनुमोदन दिले आहे. छिंदमला याआधीच उपमहापौर पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. श्रीपाद छिंदमने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. हे विधान शिवजयंतीच्या काही दिवस आधी करण्यात आले होते. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यामुळे लोकांच्या भावनाही दु:खावल्या गेल्या होत्या. तसेच मोठ्या प्रमाणात तोडफोडही अहमदनगरमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्याच उपमहापौरपद काढून घेण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!