News Flash

शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा : चंदक्रांत जाधव

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गावागावामध्ये शिवसैनिकांची संघटना बांधून शिवसेनेची एकहाती सत्ता आणेसाठी प्रयत्न करा. असे प्रतिपादन शिवसेनेचे निवडणुक निरीक्षक चंदक्रांत जाधव यांनी केले. ते गडहिंग्लज येथे आज (सोमवार) चंदगड,राधानगरी विधानसभा पदाधिकारी बैठकीत बोलत होते. यावेळी सहसंपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, राजू सावंत, अशोक मनवाडकर, नगरसेविका श्रद्धा शिंत्रे, महिला जिल्हासंघटक संज्योती मळवीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जाधव म्हणाले की, स्व. बाळासाहेबाचे विचार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत संघटनेची बांधणी केली पाहिजे. तसेच सर्व आंदोलनामध्ये सर्वात पुढे शिवसेनाच असते. शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन कर्जमाफी किती शेतकऱ्यांना झाली आहे, हे पाहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या भावना आणि मते समजून घेणे महत्वाचे आहे. आम्ही सत्तेत असूनही भाजपने सेनेला झुलवत ठेवले आहे, त्यामुळे सत्ता ही महत्वाची आहे. म्हणून निवडणूकीसाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखला असून शिवसेनेची एकहाती सत्ता आणेसाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी युवराज पोवार, अमोल नार्वेकर, तालुका प्रमुख दिलीप माने, शहर प्रमुख मनोज पवार, शहर प्रमुख सागर कुराडे, प्रतिक क्षीरसागर सुरेश हेब्बाळे यांच्यासह चंदगड,राधानगरी भागातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!