News Flash

कागल पालिकेचा २ कोटी ५६ लाखांचा शिलकी अर्थसंकल्प

कागल (प्रतिनिधी) : कागल नगरपालिकेत आज (सोमवार) २ कोटी ५६ लाख ४२ हजार २२५ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नगराध्यक्षा माणिक माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली.
कर निरीक्षक अभिजित गोरे यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. पालिकेने शासकीय अनुदान, विकास कामासाठीची कर्जे, विविध कर, भाडं व इतर बाबींपासून ३५ कोटी ७२ लाख ३९ हजार ५६३ रूपयांचे उत्पन्न दाखविले आहे. ३७ कोटी ७३ हजार २१ हजार ८३० रुपयांचा अपेक्षित खर्च धरलाय. याच्यात बांधकाम विभागासाठी दोन कोटी २८ लाख, आरोग्य विभागासाठी एक कोटी ९३ लाख ४५ हजार, पंतप्रधान आवास योजना दोन कोटी, पाणीपुरवठा विभाग एक कोटी चोवीस लाख पंचवीस हजार, सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान, दलितेतर विकास योजना, रमाई आवास, हद्दवाढ क्षेत्रातील विकास यासाठी प्रत्येकी पन्नास लाख, राजीव गांधी आवास, पालिका शाळांसाठी प्रत्येकी पंचवीस लाख, शहर वायफायसाठी दहा लाख, मागासवर्गीय दुर्बल घटकासाठी साडेआठ लाख, महिला बालकल्याण साठी आठ लाख रुपयांची तरतुद केली आहे. यामध्ये वाढ करण्याची मागणी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली.
चंद्रकांत गवळी यांनी बसस्थानकासमोर छ. शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा बसविण्यात यावा. या ठिकाणचा पुतळा शिवाजी चौकात बसविण्याची मागणी केली. विशाल पाटील यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरावा, तसेच बसस्थानकासमोरील जयसिंगराव घाटगे यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी केली. विवेक लोटे यांनी गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा चबुतरा मोठा करावा. या ठिकाणी महात्मा फुले व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात यावा असे सांगितले. सुरेश पाटील यांनी शहरात बावन्न दिवस पाणी सोडलं जात नाही. त्याची पाणीपट्टी कमी करण्याची मागणी केली.
चर्चेत उपनगराध्यक्ष प्रविण काळबर, नितीन दिंडे, मंगल गुरव, नूतन गाडेकर सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!