News Flash

वकील संघटनेची निवडणूक लढवणार : इंद्रजीत कांबळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकील संघटनेची २०१८ सालची निवडणूक २८ मार्चला होणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून उमेदवार म्हणून अॅड. इंद्रजीत अप्पासाहेब कांबळे हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अॅड. इंद्रजीत कांबळे म्हणाले की, आज दिवसेंदिवस न्यायालयीन प्रक्रिया अतिशय अवघड बनत चालली आहे. न्यायालयीन शुल्क्ल ठरवून वाढविले जात आहे. तसेच बहुजन समाजाला न्याय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या एलएलबी प्रवेश प्रक्रियेवर निर्बंध लादला जात आहे. यासह आदी प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कोल्हापूर खंडपीठाचे काम अद्यापही रखडलेले आहे. त्यासाठी खंडपीठाचे काम पूर्ण होई पर्यंत पाठपुरावा करणार आहे. कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली असणारे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.

तसेच महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकील संघटनेच्या निवडणुकीसाठी २५ उमेदवार निवडले जाणार आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातून ९ उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यामध्ये शिरोळ तालुक्यातून १, हातकणंगले तालुक्यातून २ तर कोल्हापूर शहरातून ६ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. २५ जागेसाठी १ लाख २२ हजार वकील मतदान करणार आहेत. अशी माहिती यावेळी अॅड. इंद्रजीत कांबळे यांनी दिली.

यावेळी अॅड. प्रबुद्ध कांबळे, अॅड. शरद पाटोळे, अॅड.विनयकुमार पाटील, अॅड. विजय दीक्षित, अॅड. आदिक चाळके, भंते आर.आनंद, भंते एस.संबोधी,अनिल म्हमाणे, चिंतामणी कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!