News Flash

वांद्रे येथे होणार राज्यातील पहिले मराठीचे विद्यापीठ

मुंबई (प्रतिनिधी) : वाचक चळवळ म्हणून ओळखली जाणार्याे ग्रंथालीच्या पुढाकाराने मराठी भाषेचे राज्यातील पहिले विद्यापीठ वांद्रे येथे चालू होणार आहे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते या जागेच्या हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम विधानभवनात होणार आहे. तसेच वांद्रे येथील उच्चभ्रु वस्ती, बँडस्टॅन्ड येथील जागा महानगरपालिकेने विद्यापिठाला देण्याचे मान्य केले असून त्याचे अधिकृत पत्र २७ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथालीला दिले जाणार आहे.

या ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल आणि ग्रंथालीच्या अन्य पदाधिकार्यांपसह अन्य मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे. राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, ही मागणी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून केली जात आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून अनेक वेळा करण्यात आली होती. मात्र गेल्या ६० वर्षांत त्याला मूर्त स्वरूप आले नाही.

ग्रंथालीने अशा प्रकारे अभिमत विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला होता, तसेच मराठी भाषा अभ्यास केंद्राकडूनही याचा पाठपुरावा होत होता. हे राज्यातील पहिले मराठीचे विद्यापीठ आहे. त्यामुळे त्यांची वैशिष्ट्येपूर्ण रचना व्हावी, तसेच त्यामध्ये भाषेसाठी पोषक उपक्रम कोणते आणि कसे असावेत, याविषयाची रचना याचे नियोजन चालू आहे. जागा ताब्यात मिळाल्यानंतर पुढील कामांना सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!