News Flash

पेठवडगाव पालिकेचा तीन कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

पेठवडगाव (प्रतिनिधी) : पेठवडगाव नगरपालिकेत आज (सोमवार) सन २०१८-१९ साठी अंदाजित जमा ४१ कोटी ९१ लाख ५० हजार व अंदाजित खर्च ३८ कोटी ९२ लाख ३५ हजार असा सुमारे तीन कोटींचा शिल्लकी अर्थसंकल्प एकमुखाने मंजूर करण्यात आला. आला. यामध्ये कोणतीही करवाढ व दरवाढ प्रस्तावित केलेली नाही. पालिकेत आज सन २०१७-१८ चा सुधारित व सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष अजय थोरात सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
या अर्थसंकल्पातील तरतुदी व ठळक बाबी – सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक १ कोटी, शहर सुधारित पाणी पुरवठा योजना ३ कोटी, नवीन वाहन खरेदी १० लाख, शहरातील सर्व रस्ते खडीकरण, डांबरीकरण – २ कोटी ५० लाख, शहरातील गटर्स करणे ५० लाख, डी.पी. प्लॅन – १० लाख, शहरात बोअरिंग मारणे – २ लाख, दुर्बल घटक योजना – ३ लाख, महिला बालकल्याण ३ लाख, गरिबासाठी मुलभूत सेवा – ३ लाख, अपंगांचे कल्याणाकरिता योजना ३ लाख, राज्य शहरी उपजीविका अभियान ५ लाख, अल्पसंख्याक विकास – १० लाख, अग्निसुरक्षा अभियान ५ लाख, दलितेतर योजना ५० लाख, दलित वस्ती सुधारणा १ कोटी, घनकचरा व्यवस्थापन १० लाख, वैशिष्टयपूर्ण कामे अनुदान (एलईडी व न.पा. इमारत) २ कोटी, वित्त आयोग ३ कोटी ५० लाख, रमाई आवास (घरकुल) योजना ५० लाख, खुल्या जागा संरक्षित करणे ३० लाख, युआयडीएसएसएमटी २५ लाख, दलित वस्ती पाणी पुरवठा योजना ५० लाख, नाविन्यपूर्ण योजना २० लाख, एलईडी लाईट बसविणे ५० लाख, संभाजी उद्यान विकसित करणे, शॉपिंग सेंटर, क्रीडांगण २ कोटी, शौचालय गाडी खरेदी १० लाख, सांडपाणी प्रक्रिया १ कोटी, सार्वजनिक शौचालय २५ लाख.
या सभेस युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या व नगरसेविका प्रविता सालपे, नगरसेवक संतोष गाताडे, संदीप पाटील, संतोष चव्हाण, शरद पाटील, रमेश शिंपणेकर, गुरुप्रसाद यादव, सुनिता पोळ, शबनम मोमीन, मैमुन कवठेकर, नम्रता ताईगडे, अलका गुरव, यादव पॅनेलचे नगरसेवक जवाहर सलगर, अनिता चव्हाण, संगीता मिरजकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!