News Flash

कर्जमाफीसाठी अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक संधी : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप – सेना सरकारने गतवर्षी राज्यातील शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी जाहीर केली होती. आतापर्यंत एकूण ६७ लाख अर्ज सरकारकडे प्राप्त झाले आहेत. मात्र ज्यांना काही कारणास्तव कर्जमाफीसाठी अर्ज करता आलेले नाहीत त्या शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, सरकारने आतापर्यंत ५४ लाख ७२ हजार ३११ अर्ज निकाली काढले असून त्यापैकी ४६ लाख ३५ हजार ६४८ खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापैकी ३० लाख कर्जमाफीची खाती व १६ लाख खाती प्रोत्साहन योजनेतील आहेत. आतापर्यंत १३ हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. एकूण ६७ लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १३ लाख अर्ज तालुकास्तरीय समितीकडे पडताळणीसाठी पाठविले असल्याचे आहेत. ज्यांना कर्जमाफीसाठी अर्ज करता आलेले नाहीत त्या शेतकऱ्यांना १ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!