News Flash

…आणि मुख्यमंत्र्यांना मागावी लागली सभागृहाची माफी!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज (सोमवार) सकाळी सुरुवात झाली. मात्र विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. विधानसभेच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडलाय. राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत मराठीत नसल्याचा आरोप करीत संतप्त विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. प्रचंड गदारोळानंतर विधानसभेच्या अधिवेशनास सुरुवात झाली. सरकारने मराठी भाषेचा अपमान केल्याचा विरोधकांनी केला. तर मराठी अनुवादक उपलब्ध झाला नसल्याचे कारण सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बहिष्काराचे नेमके कारण स्पष्ट केले. मुंडे म्हणाले की, सर्वसाधारणपणे राज्यपालांचे अभिभाषण जर हिंदी किंवा इंग्रजीत असेल तर अभिभाषण सुरु असताना त्याचा त्वरित मराठीत अनुवाद करून सदस्यांच्या मायक्रोफोनपर्यंत पोचविला जातो. मात्र याचे भाषांतर चक्क गुजरातीत करण्यात आले. मराठीत नव्हते. त्यामुळे आम्ही सभात्याग केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!