News Flash

‘रुस्तम’ ड्रोनची दुसरी चाचणी यशस्वी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): समुद्रसपाटीपासून मध्यम उंचीवर उड्डाण करणा-या आणि उत्तम क्षमता असणा-या रुस्तम या ड्रोनची दुसरी चाचणी यशस्वी झाली आहे. या ड्रोनची निर्मिती डीआरडीओने केली आहे. हा ड्रोन एकावेळी २४ तासांपर्यंत उड्डाण करु शकतो. या ड्रोनमुळे शत्रूवर करडी नजर ठेवण्यासोबतच शत्रूवर हल्ला करण्याचीही क्षमता आहे. या ड्रोनचे इंजिन उच्च क्षमतेचे असून चित्रदुर्गावर या ड्रोनची प्रथम यशस्वी उड्डाण केले आहे.

यावेळी डीआरडीओचे अध्यक्ष एस. क्रिस्तोफर, वैमानिक व्यवस्थेचे महासंचालक सी.पी. रामानारयन, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन व्यवस्थेचे महासंचालक जे. मंजुला आणि इतर वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!