News Flash

ओरिएन्टल बँकेला पंजाब मुख्यमंत्र्यांच्या जावयाने ९७ कोटींना ठकवले..!

चंदीगड (वृत्तसंस्था) : नीरव मोदी, मेहुल चोक्सी, सेठ ब्रदर्स यांचेनंतर देशातील आणखी एका कंपनीने एका सरकारी बँकेला ९७ कोटींचा चुना लावला आहे. सीबीआयने ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्सचे (ओबीसी) ९७ कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याप्रकरणी संभौली शुगर लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरमीतसिंग मान, उपसरव्यवस्थापक गुरूपालसिंग आणि अन्यविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुरूपालसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे जावई आहेत. सीबीआयने या प्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणांवर छापा टाकला आहे. उत्तर प्रदेशची कंपनी संभौली शुगर लि.ने २०१७ मध्ये आपल्या ताळेबंदात ७४.९८ कोटी रूपयांचे नुकसान दाखवले होते. तर यापूर्वी डिसेंबर २०१६च्या तिमाहीत कंपनीचे १८.०९ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ही कंपनी मुंबई शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध असून देशातील सर्वांत मोठ्या साखर उत्पादकांपैकी एक आहे. सरकारी बँकांचे कर्ज चुकवले न गेल्यामुळे सीबीआयने कंपनीवर छापे टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!