News Flash

बेकायदा व्यवहाराबद्दल ९५०० कंपन्यांवर मोदी सरकारची वक्रदृष्टी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक दृष्ट्या डेंजर झोनमध्ये (हाय रिस्क) असलेल्या तसेच बेकायदा व्यवहार करणाऱ्या ९५०० कंपन्यांना केंद्र सरकार धक्का देण्याच्या तायरीत आहे. केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणारी संस्था फायनान्शिअल इंटेलिजेंस यूनिटने (एफआययू) नॉन – बँकिंग फायनांंशिअल कंपन्यांची यादी तयार केली आहे.

एफआईयू-इंडिया वेबसाईटच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या यादीतील कंपन्यांना ‘हाय रिस्क’ कॅटेगरीत टाकण्यात आले आहे. ३१ जानेवारीपर्यंत मनी लॉन्ड्रींग अॅक्टच्या नियमांचे पालन केले नाही, या कंपन्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. ८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद ठरवण्यात आल्या. त्यानंतर नॉन-बॅंकींग फायनान्शिअल कंपन्या आयकर विभागाच्या (इनकमटॅक्स डिपार्टमेंट) आणि अंमलबजानी संचलनालय (इडी) रडारवर आल्या. याचे कारण असे की, या कंपन्यांनी ५००, १००० रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी त्या लोकांना मदत केली. ज्यांनी काळ्या धंद्यातून आर्थिक साम्राज्य उभे केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!