News Flash

व्यापाऱ्याचे अकाऊंट हॅक करुन ८४ लाख पळवण्याचा प्रयत्न…

नागपूर (प्रतिनिधी) : जिनिंग व्यापाऱ्याचे अकाऊंट ८४ लाख हॅक करून रुपये काढून घेण्याचा एका गुन्हेगाराने प्रयत्न केला. त्यातील १४ लाख रुपये दुसऱ्या खात्यात वळतेही केले. मात्र, लगेच ही बाब लक्षात आल्याने व्यापाऱ्याची रोकड बचावली. त्यामुळे व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणारी ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

नागपूरातील मेडिकल चौकाजवळ बोथरा कॉम्प्लेक्समध्ये राहणारे सुनील लक्ष्मीचंद बोथरा (वय ५३) यांची जिनिंग फॅक्टरी आहे. या फर्मच्या नावे असलेल्या बँक खात्याचे चेकबुक बोथरा यांच्या कार्यालयातून ३० जानेवारीला चोरीला गेले. पण ही गोष्ट बोथरा यांच्या ते लक्षात आली नाही. आरोपीने त्या चेकवर बनावट सही करून बोथरा यांच्या खात्यातून ८४ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील १४ लाख रुपये तुमकर कामत नामक व्यक्तीच्या खात्यात आरटीजीएस करून घेतले. हा गैरप्रकार लक्षात आल्याने बोथरा यांनी लगेच बँक अधिकाऱ्यांशी संपर्क करून ही संपूर्ण रक्कम फ्रीज केली. त्यामुळे आरोपीला ती काढून घेता आली नाही.

त्यानंतर आरोपीने बोथरा यांचे इंटरनेट बॅकिंग अॅयक्टिव्ह केले. त्यातून किती रक्कम कुठे शिल्लक होती, त्याची माहिती घेतली. त्या आधारे नेट बँकिंगचे स्टार टोकन रजिस्टर्ड करून बोथरा यांचा मोबाईल नंबर बदलवून घेतला. बँक खात्यातून रक्कम काढली गेल्यास लगेच संबंधित खातेधारकाला मेसेज येतो, बोथरा यांना मेसेज कळू नये म्हणून आरोपीने ही बनवाबनवी केली. मात्र, रोजचा व्यवहार होऊनही आपल्या मोबाईलवर मेसेज येत नसल्याचे लक्षात आल्याने बोथरा यांनी पुन्हा बँक अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. यावेळी गणेशपेठ पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!