News Flash

सांगरुळ येथील माळवाडी परिसरात शॉर्टसर्किटने घराला आग

सांगरुळ (प्रतिनिधी) : सांगरुळ येथील माळवाडी परिसरात अचानक वीज प्रवाहाच्या वाढल्यामुळे येथील राहत्या घरातील अंतर्गत विजेच्या वायरींगमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे प्रापंचिक साहित्यासह इतर शेतीचे साहित्ये जळून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज (रविवार) येथील स्थानिक लोकांनी स्वयंपाक घरामध्ये असलेला गॅस सिलेंडर प्रयत्न करून बाहेर काढल्याने, तसेच वीज पुरवठा खंडित केल्याने अपघाताचा मोठा धोका टळला.

माळवाडी परिसराच्या मध्यभागी सुनील भिकाजी घुंगुरकर यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे घरातील सदस्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग सुरुवातीला सौम्य असल्याचे चित्र दिसत होते. पण अचानक या आगीने रौद्ररूप धारण केल्याने स्थानिक नागरिकांची आग विझविताना तारांबळ उडाली. तब्बल दोन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात नागरिकांना यश आले. या आगीत प्रापंचिक साहित्य, जनावरांचे खाद्य, घराच्या छतासह इतर साहित्यही जळून खाक झाल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!