News Flash

गडहिंग्लज केएसए फुटबॉल लीग : नवज्योत तरूण मंडळ विजेता

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज ग्रामीण फुटबॉल लीग स्पर्धत नवज्योत तरूण मंडळाने दहा गुणांसह विजेतेपद पटकाविले. तर काळभैरी रोड फुटबॉल क्लबला उपविजेतेपद तर गडहिंग्लज युनायटेडला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. कोल्हापूर स्पोर्टस असोशिएशनच्या वतीने शिवराज महाविदयालयाच्या मैदानावर स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या संघाना उपनगराध्यक्ष उदय पाटील, पोलिस निरिक्षक बिपीन हसबनीस,शिवराज सकुंलाचे विश्वस्त दिग्वीजय कुराडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी केएसएचे सचिव माणिक मंडलिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी साखळी सामन्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या नवज्योत तरूण मंडळ,काळभैरी रोड,गडहिंग्लज युनायटेड, बेकनाळ स्पोर्टस आणि मास्टर स्पोर्टस या संघामध्ये सुपरलीगचे सामने झाले. यामध्ये नवज्योतने तीन विजय आणि एका बरोबरीच्या सामन्यासह दहा गुण मिळवत विजेतेपद पटकावले.

तर काळभैरी रोडने दोन सामन्यांच्या बरोबरी आणि दोन विजयासह आठ गुण मिळवत उपविजेतेपद पटकावले. युनायटेडने एक सामना विजय आणि दोन सामन्यांच्या बरोबरीसह पाच गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. बेकनाळने एक विजय एक बरोबरीसह चार गुण मिळवले मास्टर स्पोर्टसला गुणाचा भोपळाही फोडला नाही. या स्पर्धेमध्ये शैलेश दळवी (बेकनाळ), बाळाप्पा हुलसार (नवज्योत), स्वप्नील तेलवेकर (काळभैरी), समीर किल्लेदार (युनायटेड) यांना उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

यावेळी स्पर्धाप्रमुख संभाजी मांगोरे, सुहास साळोखे, दिपक कुपन्नावर, विश्वास कांबळे, आणाप्पा गाडवी, दयानंद पाटील, बाळासाहेब वडर, एम.एस.बोजगर यांच्यासह खेळाडू आणि फुटबॉल शौकिन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!