News Flash

मुंबईकर उकाड्याने हैराण; दिल्ली ही तापली

मुंबई (प्रतिनिधी): मुंबईकरांना फेब्रुवारी संपण्यापूर्वीच तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. रविवारी मुंबईचे तापमान ३८ अंशापर्यंत पोहोचल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झालेत. शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेमध्ये रविवारी तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली त्यामुळे नागरिकांनी एसी आणि फॅनच्या हवेखाली आसरा घेतल्याचे दिसत होते. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी लिंबू पाण्याच्या गाड्यांवरही नागरिकांनी धाव घेतली.
दरवर्षी होळीच्या दरम्यान महाराष्ट्रभर तापमानात वाढ होताना दिसते. मात्र यंदा दोन ते तीन दिवस आधीच उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे मुंबईकर म्हणत आहेत. तसेच येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मात्र सध्या असा कोणताही इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही.
मुंबईप्रमाणे दिल्लीमध्येही तापमानात वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात दिल्लीच्या कमाल तापमानात ३४.४ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. गेल्या १० वर्षात फेब्रुवारीमधील हे सर्वाच्च ताममान असल्याचे एका खासगी हवामान संस्थेने म्हटले आहे. तापमान वाढीमुळे दिल्लीकरही हैराण झाले असून रस्त्यावर नागरिक छत्र्या घेऊन फिरताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!