News Flash

‘हॉस्पिकॉन २०१८’ परिषदेची आज सांगता…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थापन हा विषय कधीच शिकवला जात नाही किंवा अभ्यासला जात नाही. एखादे हॉस्पिटल उभे करताना हॉस्पिटल बांधकामापासून त्यांची दुरुस्ती मशिनरी खरेदी व वैद्यकिय सेवा उपलब्धता यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आणि नवीन येऊ घातलेले कायदे आणि समाजाच्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून वाढत चाललेल्या अपेक्षा, अशा अनेक गोष्टींची संलग्न राहावे लागते. तसेच गुणवत्ता प्रमाणपत्र, वैद्यकीय कचरा या आणि इतर गोष्टीची माहिती कोणत्याही मेडिकल कॉलेजमधून किंवा याचे ज्ञान अनुभव दिला जात नसल्याने त्यातच वैद्यकीय कायदे, न्याय वैद्यकीय संदर्भ, ग्राहक कायदे याबाबत जागरूक राहावे लागते. याचा विचार करून कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने हॉस्पिकॉन २०१८ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आज (रविवार) या वैद्यकीय परिषदेची सांगता झाली.

यावेळी सकाळच्या सत्रात डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्री-ऑपरेटिव्ह पेशंटस् फिटनेस या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच अॅस्टर आधार हॉस्पिटलचे सीईओ डॉ. चांदीलकुमार आणि लेबर अॅडव्होकेट वाझे यांनी हॉस्पिटलच्या कर्मचा-यांना येणा-या अडचणींचे निरसन करुन एकसंघ कसे ठेवावे, या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर न्यू इंडिया एशुरन्स कोल्हापूरचे रिजनल मँनेजर आपटे यांनी डॉक्टर आणि हॉस्पिटलसाठी इन्शुंरन्स किती महत्वाचा आहे, त्याचे फायदे काय याचा उलगडा यावेळी केला.

त्यानंतर एमपीसीबी, कोल्हापूरचे दिलीप खेडकर यांनी दवाखान्यातील कच-याचे विलीनीकरण कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले. तर कन्सलटंन्ट इन्फेक्शन कंट्रोल युनिट, बेळगावचे डॉ. संजय कुलकर्णी यांनी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना होणारे इन्फेक्शनची कशा प्रकारे काळजी घ्यावी आणि हायजनिक वातावरण निर्माण करण्याचे महत्वाचे पैलू त्यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात हॉस्पिटलचे मार्केटिंग आणि ब्रँन्डींग, आयडल हॉस्पिटलसाठी मँनेजमेंट सॉप्टवेअरची माहीती तज्ञांकडून देण्यात आली. शिवाय हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्यास त्या मृताच्या नातेवाईंकाशी आपुलकीने आणि झालेल्या घटनेची माहीती कशी द्यावी, तसेच त्यांना आपल्या परीने कशा पद्धतीने आधार देता येईल. याची माहिती अॅपल हॉस्पिटलचे चेअरमन अशोक भुपाळी यांनी दिली. शिवाय एखादे हॉस्पिटल बनवताना आणि तयार केलेल्या हॉस्पिटलमध्ये आगीमुळे एखादी दुर्घटना घडू नये यासाठी घ्यावयाची काळजीबद्दल कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे चीफ ऑफिसर रणजीत चिले यांनी माहिती दिली. त्यानंतर इलेक्ट्रीकसिटी मँनेजमेंट, प्लंबर, इलेक्ट्रीकल सप्लाय, काँन्ट्रॅक्टर, सीसीटिव्ही आणि एअर कंडीशनींगची मँनेजमेंटची सुद्धा माहिती देऊन या परिषदेची सांगता करण्यात आली.

यावेळी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, सचिव संदीप साळोखे, प्रल्हाद केळवकर, डॉ. अजय शिंदे, डॉ.आनंद कामत, डॉ. अर्जुन अडनाईक, डॉ. शितल देसाई, डॉ. दिपक जोशी, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. अमर आडके, डॉ.अशोक जाधव, डॉ. गीता पिलई, डॉ. नीता नरके, डॉ. श्रद्धा वर्जमुष्ठी, डॉ. प्रिया शहा यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!