News Flash

श्रीदेवीच्या पार्थिवाचं होणार पोस्टमॉर्टेम !

दुबई (वृत्तसंस्था) : दुबईत जर एखाद्या विदेशी नागरिकाचा अचानक मृत्यू झाला तर त्या मृत्यूचा तपास करून पोस्टमॉर्टेम केले जाते. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समजू शकते. बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे दुबईत निधन झाले असून दुबईतच त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम करण्यात येणार आहे. फॉरेंसिक तपास अहवाल तयार झाल्यानंतर श्रीदेवीचे पार्थिव सायंकाळपर्यंत मुंबईत पोहोचणार आहे. श्रीदेवीच्या पार्थिवाचे अखेरचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी मुंबईतील त्यांच्या घराबाहेर गर्दी केली आहे.
परदेशातील नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर सर्वात आधी त्या देशातील दुतावासाला यासंदर्भात माहिती दिली जाते. या माहितीनंतर दुतावासाकडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा पासपोर्ट रद्द केला जातो. त्यानंतर ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते. शवविच्छेदनानंतर या अहवालात मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद केले जाते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या व्यक्तीचे पार्थिव विमानाने मायदेशी पाठवले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!