News Flash

बाबरी मशिदीचा दावा आम्ही कधीच सोडणार नाही : ओवेसी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्याच्या वादग्रस्त जागेवरील बाबरी मशिदीचा दावा आम्ही कधीच सोडणार नाही. आमची मशीद होती आहे, आणि यापुढेही राहील, असे ओवेसींनी एका कार्यक्रमात सांगितले.

बाबरी मशीदप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय श्रद्धेच्या आधारावर नव्हे तर पुराव्याच्या आधारावर येईल. जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आला तर बाबरी मशीद पुन्हा एकदा त्याच ठिकाणी उभी राहील, असा ठाम विश्वास ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.
अयोध्याच्या वादग्रस्त जागेवरचा मशिदीवरचा दावा मुस्लिम कधीच सोडणार नाहीत. काही लोक आम्हाला भीती दाखवत आहेत. आमच्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. ते आम्हाला दावा सोडायला सांगतायेत. परंतु, मी त्यांना सांगतोय की, आम्ही मशिदीचा दावा कधीच सोडणार नाही, असे ओवेसी यांनी भाजपचे नाव न घेता सांगितले.

यावेळी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरून ओवेसी यांना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, गीतांजली जेम्सचे मालक मेहुल चोक्सी, हर्षद मेहता, केतन पारेख आणि नीरव मोदी हे मुस्लिम होते का ? पंतप्रधान मोदी ज्या लोकांना भाऊ म्हणतात, त्याच लोकांनी देशाला लुटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!