News Flash

गडहिंग्लजमध्ये भाजीपाला स्वस्त : ग्राहकांना दिलासा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आज (रविवार) गडहिंग्लजच्या बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. गेल्या आठवडयापेक्षा भाज्यांचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा आहे. किरकोळ बाजारांमध्येही भाज्यांचे दर कमी झालेले दिसत आहे. या आठवडयात रविवार बाजाराची सुरूवात झाली तेव्हा भाज्यांचे दर किलाप्रमाणे असे कांदा २० रू. किलो,टॉमेटो १० रू.,बटाटा १० ते २० रू., लसूण २० ते ३० रु., गाजर ३० रु., मिरची ४० रु., कोबी १० रु., तसेच बाजारांमध्ये मेंथी, शेपू अशा भाज्या स्वस्तात मिळू लागल्या आहेत.

तर सफरचंदाची आवक कमी झाल्यामुळे सफरचंद १०० ते १४०रू. किलो असा दर आहे. सध्या सफरचंदची बाहेर देशातून आवक होत असल्यामुळे त्यांचा दर १६० ते १८० रू.किलो असा आहे. तर संत्री ८० ते १०० रु. किलो झाली आहेत. तसेच द्राक्षेची आवकही जास्त असल्यामुळे त्याचे दर तेजीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!