News Flash

‘श्रीदेवी’च्या मृत्यूआधी बिग बी झाले होते बैचेन

मुंबई (प्रतिनिधी) : बिग बी आणि अभिनेत्री श्रीदेवीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. यामुळे या दोघांत अनोखे मैत्रीचे नाते होते ते सिद्ध झाले आहे. कारण श्रीदेवींच्या निधनाआधी तासभरापूर्वी बिग बी बैचेन झाले होते. त्यामुळे “जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है!!.” असे ट्वीट त्यांनी केले होते.
श्रीदेवीचे शनिवारी (२४ फेब्रुवारी) रात्री ११.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झआले. श्रीदेवीच्या शेवटच्या काळात तिचे पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी तिच्या सोबत होती. भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी कुटुंबासोबत दुबईला गेली होती. पण तिची थोरली मुलगी जान्हवी कपूर चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने लग्नात सहभागी होऊ शकली नव्हती.
‘आखिरी रास्ता’ आणि ‘खुदा गवाह’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी एकत्र काम केले होते. अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोच्या सेटवरही श्रीदेवीने हजेरी लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!