News Flash

लक्ष्मीपुरीत लाकडी इमारतीला आग; दहा लाखांचे नुकसान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लक्ष्मीपुरी पानलाईन येथे दुमजली लाकडी इमारतीला आग लागून दहा लाखांचे नुकसान झाले.
कोल्हापुरांतील लक्ष्मीपुरी पानलाईन येथिल जैन मंदिरशेजारी असणा-या अरविंद श्रीपतराव पिसे यांच्या दुमजली लाकडी ईमारतीला आज (रविवार) सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये इमारतीचे सहा लाखाचे आणि इमारतीमध्ये रहिवाशी असणा-या सात पेंटर्संचे पेंटींग साहित्य जळुन खाक झाले. यामध्ये एकुण दहा लाखाचे नूकसान झाले.
महापालिकूच्या सहा बंबानी त्वरीत ही आग अर्ध्या तासात आटोक्यात आणली. या ठीकाणी गेली ५० वर्षाहुन अधिक काळ रविवारचा आठवडा बाजार भरतो. आजही शेकडो नागरीक आणि विक्रेते बाजारात आले असतानाच आगीची घटना घडल्याने बाजारात एकच धावपळ ऊडाली. आगीचे कारण समजु शकले नसले तरी ही आग शाँर्टसर्कीट किंवा गॅस गळतीने लागली असावी असा अंदाज व्यक्त करणयात येत आहे. वीस वर्षापुर्वीही या इमारतीला आणि एकदा धान्यबाजारास राञी आग लागली होती. त्याच्या कटू आठवणी आजच्या या आगीने ताज्या झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!