News Flash

बॉलिवूडची सुपरक्वीन ‘श्रीदेवी’ काळाच्या पडद्याआड : चित्रपटसृष्टीवर शोककळा

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडची सुपरक्वीन, हवा-हवाई गर्ल श्रीदेवी यांचे शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुबई येथे निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. या आकस्मिक घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तर करोडो चाहते हळहळले. दुबईला त्या आपल्या कुटुंबीयांसह एका विवाह सोहळ्यासाठी गेल्या असता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वृत्ताला त्यांचा दीर, अभिनेता संजय कपूर यांनी दुजोरा दिला आहे. निधनानंतर पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरसह बॉलिवूडच्या सर्वच कलाकारांनी सोशल मेडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करण्यात आला.
तामिळनाडूच्या मीनमपट्टी या छोट्याशा गावातील श्रीदेवीने 1967साली वयाच्या तेराव्या वर्षी बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरूवात केली. १९७८ साली ‘सोलहवाँ सावन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘हिम्मतवाला’ हा सिनेमा बॉलिवूडमध्ये धडाकेबाज पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गावाह, जुदाई अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. चांदनी, चालबाज,लम्हे, सदमा, मि.इंडिया,जुदाई असे अनेक सुपरहिट सिनेमे तिने दिले.
दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी विवाह केल्यानंतर काही काळ ती पडद्याआड गेली. २०१२ मध्ये श्रीदेवीने ‘इंग्लिश विग्लिश’ या सिनेमातून पुन्हा कमबॅक केलं. अलीकडेच श्रीदेवीचा ‘मॉम’ हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यांची मुलगी जान्हवी ही धडक या सिनेमातून पर्दापण करतेय. लेकीच्या प्रमोशनसाठी श्रीदेवी काम करत होत्या. मात्र, आज अचानक त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर दुखाचा डोंगर कोसळला असून अनेक कलाकार दु:ख व्यक्त करत आहेत.

राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही ट्विट करून आपली आदरांजली वाहिली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
अभिनेत्री श्रीदेवींच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला. मुंद्रम पीरई, लम्हे, इंग्लिश विंग्लिश सारख्या सिनेमांमधील त्यांचा अभिनय सगळ्या नव्या अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी राहील.माझ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवींच्या अकाली निधनानं अतीव दुःख झालं. चित्रपटसृष्टीतल्या त्या दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या, त्यांची अनेक पात्र अजरामर झाली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!