News Flash

हिंमत असेल तर सदाभाऊंऐवजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक करा : सुरेशदादा पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंमत असेल तर सदाभाऊ खोत यांच्या वाहनाऐवजी प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर दगडफेक करावी, असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी दिले. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज (शनिवार) रोजी माढा मतदारसंघात दौऱ्यावर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. याच्या निषेधार्थ आज सायंकाळी दसरा चौकात संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी सुरेशदादा पाटील म्हणाले की, आम्ही संयम बाळगला आहे. जर दंडुकेशाही करायची असेल तर त्याला आम्ही तयार आहोत. आमचे नेते सदाभाऊ खोत हे तळागाळातील लोकांना जाऊन भेटतात. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करत आहेत. ते काही लोकांना बघवत नाही. राजू शेट्टी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे. या मागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, सिद्धू घुगे, हे दगड फेकण्यात अग्रेसर आहेत. हे प्रकार न थांबल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ शकतो.
या वेळी संतोष कांडेकर, महेश हंकारे, विशाल तावडे, यशवंत मोरे, अविनाश कारेकर, सलमान मोमीन यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!