News Flash

महिलादिनी जिल्ह्यातील ११ गावांत भागीरथी वाचनालय : अरुंधती महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवती आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी भागीरथी महिला संस्थेचे काम अव्याहत सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ११ ठिकाणी भागीरथी वाचनालयाचा शुभारंभ होणार आहे. ८ मार्च रोजी असलेल्या जागतिक महिला दिनाच्या औचित्याने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि प्रत्यक्ष पुस्तकांचे वितरणही केले जाईल, अशी माहिती भागीरथी महिला मंचच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.
त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांच्या वाचनवृद्धीसाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. वडकशिवाले, सडोली दुमाला, सांगरुळ, कनाननगर, कागल, गारगोटी, संभाजीनगर, शिरोली, कसबा बीड, केर्ली, वाखरे या येथे भागीरथी वाचनालयांचा शुभारंभ होणार आहे. शिवाय अशिक्षितांसाठी पुस्तकांचे सामूहिक वाचन, दर १५ दिवसांनी एखाद्या पुस्तकावर चर्चासत्र असेही कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या वाचनालयांसाठी कोणीही पुस्तके देऊ शकतो. आपल्याकडे असणारी प्रसिद्ध लेखकांची दर्जेदार आणि वाचनीय पुस्तके, संग्राह्य ग्रंथ, कथा, कादंबर्या , दिवाळी अंक किंवा कोणत्याही प्रकारातील उत्तम स्थितीतील नवीन जुनी पुस्तके भागीरथी वाचनालयाकडे देऊ शकता. धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी महिला संस्थेने सुरुवातीला २५ हजार पुस्तके देऊन वाचनालयाची पाया भरणी केली आहे. २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या दरम्यान भागीरथी महिला संस्था कार्यालय आणि शाहू जलतरण तलाव येथे पुस्तके स्वीकारली जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!