News Flash

छिंदम प्रकरणानंतर पुन्हा एकाकडून शिवरायांबद्दल अपशब्द : व्हिडिओ व्हायरल

पुणे (प्रतिनिधी) : पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या छिंदम प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यात उमटल्यानंतर पुन्हा एकदा तसाच प्रकार पुण्यात समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याचा व्हिडिओ एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला असून पोलिसांनी या ग्रुपच्या अॅडमिनला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुण्यातील समर्थ आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माजी नगरसेवक अनिस सुंडके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा हसीना इनामदार यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलल्याचा व्हिडिओ आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ समर्थ पोलीस स्टेशन आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या ठिकाणी त्यांनी या प्रकाराविरोधात तक्रार दिली असून याप्रकरणी ग्रुप अॅडमिनला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!