News Flash

गडहिंग्लजमधील गल्ल्यांमध्ये स्पीडब्रेकर बसविण्याची शिवसेनेची मागणी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरामधील प्रभाग क्र.४ सह अन्य गल्लीमध्ये स्पीडब्रेकर करावेत व पूर्वी बसविण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारावेत अशा मागणीचे निवेदन गडहिंग्लज शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील मांडेकर गल्ली, खणगांवे गल्ली, कासार, तोरगल्ली, धनगर, आजरी, भमानगोळ गल्ली इ. सह शहरात अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असते त्यामुळे लहान मुलांना, तसेच वयोवृद्ध नागरिकांना वाहन धडकण्याची शक्यता असते. तसेच स्पीडब्रेकरला पांढरे पट्टे नसल्याने अनेक अपघात घडत आहेत. तरी स्पीडब्रेकर करावेत व बसवलेल्या स्पीडब्रेकरला पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी गडहिंग्लज शिवसेना पक्षाकडून करण्यात आली. या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, शाखाप्रमुख हलाप्पा भमानगोळ, शेखर पाटील, अमित कोरी, बसवराज बंदी, सचिन दिंडे, प्रथमेश धबाले, सचिन चौगुले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!