News Flash

मुख्य सर्व्हर ‘डाऊन’ झाल्याचा फटका कोल्हापुरातल्या पोस्ट कार्यालयाला…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टपाल खात्याचा चेन्नई येथे असलेला मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने गुरुवारपासून कोल्हापुरातील पोस्ट कार्यालयातील यंत्रणा ठप्प झाली होती. आज (शनिवार) सकाळपासून सर्व्हर पूर्ववत झाला, मात्र योग्य गतीअभावी सर्व कामे संथ गतीनेच सुरू होती.
चेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने देशभरातील पोस्ट कार्यालयातील कामकाज गुरूवार सकाळपासून ठप्प झाले होते. सर्व्हरविना कर्मचाऱ्यांना काहीच काम करता येत नव्हते पोस्टात बचत खात्यांसह विविध व्यवहार केले जातात. पण तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने सगळे काम ठप्प झाले आहे. पण ज्यांच्याकडे पोस्टाचे एटीएम आहे त्यांना दहा हजारांपर्यंतची रक्कम मिळत आहे. पोस्टाची जिल्ह्यात तीन-चार एटीएम सेंटर असली, तरी त्यांचे कार्ड कोणत्याही एटीएम मशीनला चालत असल्याने या ग्राहकांना त्याची फारशी झळ बसत नाही.
आज सकाळपासून रमणमळा येथील मुख्य कार्यालयात संथ गतीने सर्व्हर सुरू झाल्याने कामकाज थोडे सुरळीत झाले. इतर कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्याने पैसे भरणे व काढणे बंद होऊन ग्राहकांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!