News Flash

जमिनी दिल्या नाहीत, तर प्रकल्प कसे होणार? : चंद्रकांतदादा पाटील

आजरा (प्रतिनिधी) : राज्यातील जमीन सरकारच्या मालकीची असून ती जनतेला भाड्याने वापरण्यास दिली आहे. प्रकल्प उभारताना या जमिनी शासनाला देऊन सहकार्य करावे. धरण प्रकल्पांसाठी जमिनी मिळाल्या नाहीत तर त्यांची पूर्तता कशी होणार, असा सवाल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. ते आज (शनिवार) आजरा येथील प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. धनंजय महाडिक होते.

यावेळी पाटील म्हणाले की, केवळ प्रकल्पग्रस्तांनीच नव्हे, तर भविष्यात पाण्याचा लाभ घेणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्याही जमिनी मिळाल्याशिवाय प्रकल्प होणार नाहीत. शासनाची चांगल्या राज्याच्या निर्मितीचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगत त्यासाठी प्रामाणिक ठेकेदार मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत नव्या प्रशासकीय वास्तूतून नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचे आवाहन केले. श्री. महाडिक, आ. संध्यादेवी कुपेकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भाषणे झाली. प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी सभापती रचना होलम, शिरीष देसाई, जयवंत शिंपी, मुकुंददादा देसाई, रवींद्र आपटे, अरुण देसाई, बाबा देसाई, जनार्दन टोपले, डॉ. अनिल देशपांडे आदी उपस्थित होते. तहसीलदार अनिता देशमुख यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!