News Flash

एअरटेलकडून ५ – जी नेटवर्कची यशस्वी प्रायोगिक चाचणी

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या देशभरात ४ – जी नेटवर्क बाळसे धरत असताना ५ जी नेटवर्कची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा चिनी कंपनी हुवाई आणि भारती एअरटेलने केली आहे. एअरटेलच्या नेटवर्कद्वारे मनेसरमध्ये (गुरुग्राम) ही चाचणी घेण्यात आली. यावेळी ३ जीबीपीएसहून जादा स्पीड मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या बाबत माहिती देताना भारती एअरटेलच्या नेटवर्कचे संचालक अभय सावरगावकर यांनी सांगितले, की ५ जीच्या इंटर ऑपरेबिलिटी अॅण्ड डेव्हलपमेंट टेस्टींग तंत्रज्ञानाबाबत आम्ही वेगाने पुढे जात आहोत. आम्ही भागीदारासोबत रोबोटिक यंत्रणा तयार करत असून नुकत्याच घेतलेल्या चाचणीतून ३.५ गिगाहार्टझ ते १०० मेगाहार्टझच्या बॅंण्डविथची चाचणी घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. या वेळी एंड टू एंड नेटवर्क लॅटन्सी एक मिलिसेकंद नोंदविण्यात आली. ५ जीची चाचणी ही देशातील दूरसंचार क्रांतीत मैलाचा दगड ठरण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!